पुणे : पुणे शहरातील कोरेगाव परिसरातील अग्रसेन सोसायटीमध्ये राहणार्या 80 वर्षाच्या आजोबांकडे केअर टेकर म्हणून कामास असलेल्या मध्यप्रदेश येथील 15 वर्षीय अल्पवयीन आरोपीने चाकू चा धाक दाखवून, हात पाय बांधुन 32 हजार रुपये आणि दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली.तर या प्रकरणातील अल्पवयीन आरोपींला 12 तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन च्या वरिष्ठ निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार,कोरेगाव परिसरातील अग्रसेन सोसायटीमध्ये जगदीश प्रसाद अग्रवाल हे आजोबा राहण्यास आहेत.वीस दिवसापूर्वी केअर टेकर म्हणून 15 वर्षीय मुलाला कामासाठी ठेवण्यात आले होते.या वीस दिवसांच्या कालावधीत जगदीश प्रसाद अग्रवाल यांच्या घरी कोणीही नातेवाइक आले नाही.हे पाहून आरोपी मुलाने 1 जानेवारी रोजी सायंकाळी 7 ते 8 च्या सुमारास जगदीश प्रसाद अग्रवाल यांना चाकू चा धाक दाखवून बेडरूम घेऊन गेला आणि त्यांचे हात पाय बांधले, तोंडाला रुमाल बांधला, तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत.तेवढे द्या नाही तर मी तुम्हाला मारून टाकेन,अशी धमकी दिली.
हेही वाचा…सुरक्षित रिक्षाप्रवासाची हमी कोण देणार ? त्रस्त प्रवाशांचा सवाल
े
त्यानंतर आरोपीने कपाटामधील 32 हजार रुपये आणि दोन मोबाईल घेऊन तेथून पसार झाला.जगदीश प्रसाद अग्रवाल यांच्या तोंडाला रुमाल होते.त्यामुळे बाहेर आवाज देखील जात नव्हता,पण जवळपास अर्ध्या तासानंतर त्यांना रुमाल काढण्यात यश आले आणि त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक गोळा झाले.त्या घटनेची माहीती मिळताच आमची टीम घटनास्थळी दाखल आली आणि त्या आजोबांना रुग्णालयात दाखल केले.त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीच्या शोधासाठी टीम रवाना करण्यात आल्या.तर मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हा कर्नाटक एक्स्प्रेसने रेल्वेने मध्यप्रदेशाच्या दिशेने जात असल्याचे समजले.त्या माहिती च्या आधारे भुसावळ पोलिसांच्या मदतीने अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.या आरोपीला 12 तासाच्या आतमध्ये अटक करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.