लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : अत्याचार, तसेच अश्लील कृत्य केल्याने १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो), तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime News
Crime News : ‘टॉयलेट सीट चाटायला भाग पाडलं…’, १५ वर्षीय विद्यार्थ्याची रॅगिंगला कंटाळून आत्महत्या; आईचा न्यायासाठी आक्रोश
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
40 year old construction worker arrested for sexually assaulting eight year old boy in Bijlinagar of Chinchwad
पिंपरी : चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलावर अत्याचार
Student Suicide, Online Game, German Language Suicide note ,
‘ऑनलाईन गेम’च्या नादात विद्यार्थिनीची आत्महत्या, दोनदा प्रयत्न फसले, जर्मन भाषेत ‘सुसाईड नोट’ अन्…
Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Case filed against women who brutally beat three-year-old son
तीन वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या आईविरोधात गुन्हा
14 year old school boy committed suicide by shooting himself in head with his fathers revolver at Adhegaon in Madha taluka
शाळकरी मुलाची गोळी झाडून आत्महत्या
Policemans son commits suicide by shooting himself with revolver
पोलिसाच्या मुलाने रिव्हॉल्वरने गोळी झाडून केली आहत्महत्या

संकेत राजेश मोहिले (वय २६, रा. धम्मपाल संघाजवळ, ३१८ भवानी पेठ आणि मोहननगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगा आणि आरोपी संकेत मोहिले यांची ओळख होती. मोहिलेने मुलाला आमिष दाखवून वर्षभरापूर्वी तळजाई टेकडी परिसरात नेले. तेथे त्याने मुलाबरोबर अश्लील कृत्य, तसेच अनैसर्गिक अत्याचार केले. मोहिलेने मोबाइलवर छायाचित्रे काढली. त्यानंतर त्याने मुलाला धमकाविण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा-पुण्यात होणार नव्याने प्रभाग रचना, काय आहे कारण ?

मुलाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून त्याला धमकावले. त्रासामुळे मुलाने १५ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. चौकशीत मोहिलेने मुलावर अत्याचार करुन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे उघड झाले. त्यानंतर याप्रकरणी मोहिलेला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

Story img Loader