– सागर कासार
जगभरात करोना विषाणूंने थैमान घातले असून आपल्या देशात देखील दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र तरी देखील रुग्ण वाढत आहे. यामध्ये सर्व सामन्य नागरिकसह रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स हे देखील बाधित आढळले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील दस्तुर स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणार्या विराज राहुल शाह या १४ वर्षाच्या मुलाने कोव्हिड 19 वाॅर बाॅट रोबोट तयार केला असून या रोबोटच्या माध्यमातुन एखाद्या रुग्णापर्यंत वस्तु पोहोचविणे अगदी सहज शक्य होणार आहे. तर विराज आणि त्याचे दोन मित्र दीप, करण यांच्या मदतीने तयार केल्याने, त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे. हा रोबोट पुणे महापालिकेच्या नायडू सांसर्गिक रोगांच्या रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेसाठी आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
या कोव्हिड 19 वाॅर बाॅट रोबोट बद्दल विराज शाह याच्याशी संवाद साधला असता तो म्हणाला की, आपल्या इथे मार्च महिन्यात करोना विषाणूचा रुग्ण आढळल्यानंतर शाळा बंद करण्यात आल्या. त्याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना लढाईत प्रत्येकाने आपले योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार माझ्या बाबांनी आपण काही केले पाहिजे, अशी आमच्यात चर्चा झाली. त्यामध्ये डॉक्टरां आणि नर्ससाठी आपण रोबोट करण्याच ठरवले. त्यानंतर आम्ही पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. आमची संकल्पना सांगितली, त्यांना आमची संकल्पना आवडली. नायडू रुग्णालया मधील डॉक्टरांची भेट घेऊन नेमक्या कोणत्या अडचणीचा सामना करतात, हे समजून घेण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही तेथील डॉक्टरांना भेटल्यावर खूप गोष्टी समजण्यास मदत झाली. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तेथील सर्व डॉक्टर, नर्स हे पीपीई कीट घालून असतात. त्या सर्वांना त्याचा खूप त्रास होत होता. ते पाहून, डॉक्टर आणि नर्स यांचा रुग्ण पर्यंत जाण्याची वेळ कमी यावी. त्या दृष्टीने मी दीप आणि करण या माझ्या मित्रा सोबत चर्चा केली. तेव्हा ते दोघे म्हटले की, आपण निश्चित करू. तेव्हा आम्ही रोबोट करण्यास सुरुवात केली.
पण अगदी सुरुवातीला आम्हाला समस्येला सामोरे जावे लागले म्हणजे इलेक्ट्रॉनिक मार्केट बंद असल्याने, रोबोट तयार करण्यास लागणारे साहित्य कशा मिळवायच्या, असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा माझ्या बाबांचे मित्र संदीप शाह यांनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडून इलेक्ट्रॉनिक साहित्य वेळोवेळी मिळून दिले. त्यानंतर कामाला सुरुवात झाली. त्यानुसार आम्ही 45 दिवसात 3 फुट उंच, तीन कपे, त्यामध्ये औषध, जेवणाचा डब्बा, चादर असे सर्व साहित्य मिळून, अंदाजे 30 किलो पर्यंत वस्तूंची ने करू शकणार रोबोट तयार केला आहे. हा रोबोट मोबाईलच्या माध्यमातुन ऑपरेटिंग करता येतो. तसेच रोबोट तयार करतेवेळी अनेक आठवणी असून या करोना लढाईत मला सहभागी होत आल्याचे एक वेगळच समाधान असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
हा रोबोट तयार करण्यास मदत करणारे करण शाह आणि दीप सेठ म्हणाले की, विराज आमच्या दोघांकडे आल्यावर म्हटला की, रोबोट कसा तयार करायचा आहे. आम्ही दोघे म्हटलो की, आपण करुयात म्हणून, रोबोट तयार करण्याबद्दल आम्हाला माहिती होती. मात्र तरी देखील आम्ही इंटरनेटवरुन आम्ही बर्यापैकी माहिती मिळवली. रोबोट तयार करताना त्याच कोडी तयार करणे, सर्वात महत्वाचे होते. ते आम्हा दोघांना करता आले आणि अखेर आमच्याकडून 45 दिवसात कोव्हिड 19 वाॅर बाॅट रोबोट तयार करण्यात आम्हाला यश आल्याने खूप आनंदी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच आम्ही करोनाच्या लढाईत योगदान दिले आहे. त्या प्रमाणे समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीने योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.