पुणे : व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची १७ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी मनीष पांडे (रा. वानवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ब्रिजेश अच्युतन नायर (वय ४२, रा. वाघोली) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार नायर यांची आरोपी पांडेशी ओळख झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ग्राफीलाॅजी व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष पांडेने त्यांना दाखविले होते. ग्राफीलाॅजी व्यवसायातील समाजमाध्यमात प्रसारित केल्यास फायदा होईल, तसेच पुण्यात व्यावसायिक कार्यालय सुरू करण्याचे आमिष दाखवून पांडेने नायर यांच्याकडून १७ लाख २५ हजार रुपये घेतले. त्यानंतर पांडेने नायर यांना कोणताही परतावा दिला नाही.नायर यांनी विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नायर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक धनवडे तपास करत आहेत.