पिंपरी: पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या जलतरण तलावात बुडून सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी चारच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी साईऍक्वा मरीन जलतरण तलाव तसेच जीवरक्षक यांच्यावर हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे. राहुल महंतप्पा वाघमोडे वय वर्ष १७ असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सुरज वाघमोडे यांनी चिखली पोलीसात तक्रार दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा साईऍक्वा जलतरण तलावात मित्रांसह पोहण्यासाठी गेला होता. तिथे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. गेल्या काही दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. यामुळे अनेक मुले-मुली जलतरण तलावाकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, मंगळवारी घडलेल्या घटनेमुळे जलतरण तलावात पोहण्यासाठी जाणाऱ्या मुला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. या घटनेप्रकरणी जीवरक्षक तसेच साईऍक्वा मरीन जलतरण तलाव यांच्यावर हलगर्जीपणा केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुलचा घातपात आहे की आणखी काही या दिशेनेदेखील पोलीस तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 17 year old boy dies after drowning in swimming pool in pimpri chinchwad kjp 91 mrj