पुणे : म्हाडा पुणे विभागाकडून २० टक्के योजनेंतर्गत १७०० घरांची सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या आधी म्हाडाच्या घरांसाठी सोडत प्रक्रिया सुरु करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. आचारसंहितेच्या कालावधीमध्ये अर्ज मागवून त्यानंतर सोडत काढली जाणार आहे. आचारसंहितेच्या कालावधीचा असा उपयोग म्हाडा पुणे मंडळाकडून केला जाणार असल्याचे म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामान्यांना स्वस्तात घरे मिळवून देण्यासाठी पुण्यात आता सरकारी किंवा म्हाडाच्या मालकीच्या जागा राहिल्या नाहीत. त्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील जिल्ह्यातील विविध भागांमध्ये रहिवाशी क्षेत्रासाठी जागा आरक्षित आहेत. त्यापैकी काही जागा मिळविण्याचा म्हाडाचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत पत्रव्यवहारही सुरू आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन एकर जागा लवकरच म्हाडाच्या ताब्यात येणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील सातारा शहराजवळील दरी येथे सुमारे पाच एकर जागा मिळण्यासाठी चाचपणी सुरू आहे. सोलापूर येथे पोलिस वसाहतीमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. निवासस्थाने पाडून नव्याने बांधून देण्याचा प्रस्ताव आहे. त्या ठिकाणी सुमारे आठ ते दहा एकर जागा म्हाडासाठी वापरता येणार आहे, असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1700 houses will be drawn under 20 percent scheme from mhada pune division pune print news psg 17 amy