पिंपरी: महापालिकेचे शहरातील १७२ व्यापारी गाळे धूळखात पडून आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ५३ गाळे हे भोसरीतील व्यापारी संकुलात आहेत. गाळे वापराशिवाय पडून असल्याने महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

महापालिकेने शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरात ९४६ व्यापारी गाळे उभारले आहेत. त्यांपैकी १८७ गाळ्यांचा वापर महापालिकेमार्फत केला जात आहे. ३९२ गाळ्यांचे भाडेकराराने वितरण करण्यात आले आहेत. तर, दरमहा भाडेतत्त्वावर १९४ गाळे देण्यात आले आहेत. तथापि, १७२ गाळे रिक्त असून, त्यांचे वितरण झालेले नाही. प्रभाग स्तरावर दरमहा भाडेतत्त्वाने देखील गाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर हे गाळे असल्याने त्याला मागणी नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते.

Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Number of people injured while bursting firecrackers on Diwali rises to 49 mumbai print news
दिवाळीत फटाके फोडताना जखमी झालेल्यांची संख्या ४९ वर
terror among the villagers after tiger kills man in melghat
मेळघाटात वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यू ; गावकऱ्यांमध्‍ये दहशत
without helmet officers and employees should be banned from pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : हेल्मेट नसल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिकेत मज्जाव
navi Mumbai car hit six people
नवी मुंबई: मित्राच्या स्कुटीला धडक मारल्याचा राग आल्याने सरळ पाच – सहा जणांच्या अंगावर घातली गाडी
fire incidents at 14 places in pune city on lakshmi laxmi pooja
पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात ३१ ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या
rickshaw driver punched police crime against wife mother along with rickshaw driver
जनता वसाहतीत ‘रुट मार्च’ अडवून रिक्षाचालकाकडून पोलिसांना धक्काबुक्की

हेही वाचा… पिंपरी-चिंचवडकरांची दिवाळीत वाहन खरेदी जोरात… पाच हजार ३१३ वाहनांची खरेदी

महापालिकेच्या व्यापारी गाळ्यांचे नागरिकांच्या मागणीनुसार पाच ते दहा वर्षांसाठी भाडेपट्ट्याने (लीज तत्त्वावर) वितरण केले जाते. त्यासाठी एकरकमी तीन ते दहा लाख रुपये इतके शुल्क आकारण्यात येते. प्रभाग स्तरावर दरमहा भाडेतत्त्वाने देखील गाळ्यांचे वितरण झाले आहे. त्यासाठी गाळ्यांच्या क्षेत्रानुसार तीन ते बारा हजार रुपये इतके दरमहा भाडे घेण्यात येत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षांत भूमी आणि जिंदगी विभागाला गाळ्यांच्या भाड्यातून सर्वाधिक म्हणजे तीन कोटी ४३ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षांत १७२ गाळे भाड्याने गेले असते, तर महापालिकेच्या उत्पन्नात भर पडली असती.

सांस्कृतिक केंद्रांतून उत्पन्न

महापालिकेने नागरिकांना विविध कार्यक्रम घेता यावे, या उद्देशाने शहरात विविध ठिकाणी सांस्कृतिक केंद्र, सभागृहांची उभारणी केलेली आहे. त्यातील काही सांस्कृतिक केंद्रांमध्ये सध्या ज्येष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्र, विविध कलाकौशल्याचे वर्ग सुरू आहेत. यातील काही केंद्र व सभागृह ठरावीक कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देऊन महापालिकेला उत्पन्न मिळत आहे.

शासकीय दराने मागेल त्याला गाळा यानुसार गाळे वितरित करण्यात येत आहे. रिक्त असलेल्या १७२ व्यापारी गाळ्यांचे वितरण करण्यासाठी वेळोवेळी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. भोसरीतील व्यापारी संकुलातील समस्या निराकरण करण्याचे काम सुरू आहे. – विजय सरनाईक, सहायक आयुक्त, भूमी आणि जिंदगी विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका