पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत नाराज माजी नगरसेवकांचा एक गट विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात उभा राहिला आहे. यावर आमदार अण्णा बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार जो योग्य निर्णय घेतील तो मला मान्य असेल. चार इच्छुकांपैकी एकाला उमेदवारी दिल्यास त्या व्यक्तीचं मी काम करेन असं स्पष्टपणे आमदार बनसोडे यांनी सांगितलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमधून आमदार अण्णा बनसोडे यांच्यासह शिवसेना शिंदे गटातून जितेंद्र ननावरे, आरपीआय गटातून चंद्रकांता सोनकांबळे, भाजपमधून राजेश पिल्ले, राष्ट्रवादी अजित पवार गटातून काळूराम पवार हे पिंपरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. इच्छुकांचा पाठीमागे १८ माजी नगरसेवकांचं पाठबळ उभा राहिला आहे. १८ माजी नगरसेवकांनी आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिल्यास काम करणार नसल्याचा इशारा दिला आहे. तसा ठराव त्यांनी केला आहे. यावर अण्णा बनसोडे यांनी त्यांचे स्पष्ट मत व्यक्त केला आहे. महायुतीमध्ये पिंपरी विधानसभेचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा अजित पवारांना आहे. ते जो उमेदवार देतील त्यांचं मी प्रामाणिक काम करेन. असं बनसोडे म्हणाले. पुढे ते म्हणाले, यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश बहल यांच्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. नवीन आणि जुन्या चेहऱ्याला संधी द्यावी मी त्यांच्या पाठीशी आहे. हे त्यांचं म्हणणं योग्य असल्याचं बनसोडे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा >>>आर्थिक फसवणूक झाल्याने व्यापाऱ्याची आत्महत्या; सातजणांविरुद्ध गुन्हा

१६ ते १७ विद्यमान आमदारांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. आमचे ४० ते ४२ आमदार आहेत. इतर आमदारांना एबी फॉर्म लवकरच देतील. अनेक ठिकाणी इच्छुकांची गर्दी जास्त असल्याने मतदार संघातील निर्णय उशिरा होत आहेत. यामुळे एबी फॉर्म त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही. एबी फॉर्म वरून अजित पवारांवर अविश्वास मी दाखवणार नाही. मला अजित पवारांवर विश्वास आहे. ते योग्य उमेदवार देतील.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 18 against former corporator mla anna bansode pimpri assembly constituency kjp 91 amy