पुणे : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी युवतीचा मृत्यू झाल्याची घटना बाणेर भागात घडली. अपघातात दुचाकीस्वार महिला जखमी झाली असून, पसार झालेल्या डंपचालकाविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुक्ता संतोष काळे (वय १९, रा. म्हाळुंगे, बालेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार महिला शिल्पा कांबळे (वय ३६, रा. बालेवाडी गाव) जखमी झाल्या. याबाबत कांबळे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुक्ता काळे ब्युटीपार्लर प्रशिक्षण अभ्यासक्रम करत होती. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास दुचाकीस्वार शिल्पा कांबळे आमि मुक्ता काळे बाणेर भागातील गणराज चौकातून निघाल्या होत्या. त्या वेळी सिग्नलला थांबलेल्या दुचाकीला पाठीमागून भरधाव डंपरने धडक दिली. दुचाकीवरील सहप्रवासी मुक्ता डंपरच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वार शिल्पा यांना दुखापत झाली. सहायक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव तपास करत आहेत. शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर दिवसा अवजड वाहनांना बंदी आहे. बंदी आदेश धुडकावून डंपर, सिमेंट मिक्सर, अवजड मालवाहू ट्रक शहरातील महत्वाच्या रस्त्यांवरून जातात. अवजड वाहनांमुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात.