पुणे :  पुणे-बेळगाव विमानसेवा आता पुन्हा सुरू होत आहे. मागील काही महिन्यांपासून ही सेवा बंद होती. सध्या पुण्याहून बेळगावसाठी दोन विमान कंपन्यांची सेवा सुरू होत आहे.पुण्याहून काही मोजक्याच मार्गावर ‘उडान’ योजनेअंतर्गत  विमानसेवा सुरू आहे. त्यात बेळगाव विमानसेवा सुरु झाली होती. मागील वर्षी प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असतानाही तांत्रिक कारण देत ही सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी पुण्यातील प्रवाशांनी केली होती. या मागणीवर कोणतीही कार्यवाही झालेली नव्हती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा तेरा जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप वार करून केला खून

अखेर बेळगावमधून लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यानंतर हालचाली सुरु झाल्या आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ऑक्टोबरपासून पुणे- बेळगाव सुरु करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दोन कंपन्या विमानसेवा सुरू क रीत आहे. यात इंडिगो व स्टार एअर यांचा समावेश आहे. स्टार एअरची सेवा दररोज असेल, तर इंडिगोची सेवा मंगळवार, गुरुवार व शनिवारी अशी आठवड्यातून तीन दिवस असेल.

 अशा असतील विमानांच्या वेळा…

– स्टार एअरची सेवा २९ ऑक्टोबरपासून सुरू होत असून विमान बेळगावमधून सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी विमान उड्डाण करेल आणि पुण्यात ६ वाजून ४५ मिनिटांनी पोचेल. पुण्यातून विमान सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी उड्डाण करेल आणि बेळगाव मध्ये रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पोहचेल. – इंडिगोचे विमान बेळगावमधून सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी उड्डाण करेल पुण्यात सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी पोचेल. पुण्यातून विमान सायंकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण करेल आणि बेळगावमध्ये रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी पोचेल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 airlines start pune belagavi flights service again pune print news stj 05 zws