पुणे : महिलेच्या डोक्यात दगड मारून, तसेच पतीवर पिस्तुलातून गोळीबार करुन पसार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. दगड मारल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पालखी महामार्गाच्या कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिले ‘हे’ आदेश !

मयूर शंकर जाधव (वय ३२, रा. कुरुळी, ता. खेड, जि. पुणे), प्रथमेश उर्फ सोन्या आनंदा वाहिले (वय २३, रा. केळगाव, चिंबळी-आळंदी रस्ता, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा परिसरात आरोपी जाधव, वाहिले आणि तीन साथीदार मोटारीतून आले. मोकळ्या जागेत आरोपी लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी रखवालदार अक्षय चव्हाण याने आरोपींना हटकले. आरोपींनी चव्हाण याच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला, तसेच त्याची पत्नी शीतला दगड फेकून मारला. दगडफेकीत शीतल गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणी भानूदास शेलार, अजय मुंढे, सतीश उर्फ नाना मुंढे यांना अटक केली होती. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले होते.

हेही वाचा >>> पुणे : प्रशासन ऐकत नसल्याने भाजपचे मंत्री झाले हतबल ! म्हणाले…

त्यांच्याबरोबर असलेले आरोपी जाधव, वाहिले यांचा गुन्हे शाखेच्या युनिट सहाकडून शोध घेण्यात येत होता. जाधव आणि वहिले यांना खेड शिवापूर परिसरात सापळा लावून पकडण्यात आले. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवाई, वाहिद पठाण, दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, गणेश ढगे, प्रदीप राठोड, सुहास तांबे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे यांनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 arrested for firing in theur pune print news rbk 25 zws