“राजकारण महाराष्ट्राचे” या फेसबुक पेजवरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून भारतीय दंड संहिता कलम 78, 79, 351(3), 351(4), 61(2) BNS तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 67A अंतर्गत मुंबई सायबर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी आकाश दिगंबर डाळवे (वय 30, रा. यावळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) आणि अविनाश बापू पुकळे (वय 30, रा. उरळी कांचन, जिल्हा पुणे) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.या दोघांना आज गिरगाव येथील 18 व्या मेट्रोपॉलिटन कोर्टात हजर करण्यात येणार आहे.तर या पूर्वी या प्रकरणात एकूण 9 आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक
या पूर्वी या प्रकरणात एकूण 9 आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 12-02-2025 at 12:19 IST | © IE Online Media Services (P) Ltd
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 arrested for obscene posts on state women s commission chief rupali chakankar svk 88 zws