शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील शाळेत चौदा वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटनी सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
वैभव नारायण ढोमे (वय २०, रा. पिंपरखेड, ता. शिरुर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी फिर्याद दिली आहे. शिरुर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी सोमवारी सकाळी शाळेत दहावीच्या तासाकरिता आली होती. तास सुरू होण्यास वेळ असल्यामुळे ती पाणी पिण्यासाठी शाळेबाहेर आली. पाणी पिऊन पुन्हा तासासाठी जात असताना वैभव याने मुलीस जबरदस्तीने शाळेतील एका वर्गात नेले. या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. त्या खोलीत तिला कोंडून ठेवले. पीडित मुलीचे नातेवाईक घरातील विवाह समारंभाची पत्रिका शिक्षकांना देण्यासाठी शाळेत आले तेव्हा मुलगी तासाला नसल्याचे दिसून आले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ढोमे याच्यावर भा.द.वि. कलम ३७६, आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक क्षीरसागर हे अधिक तपास करत आहेत.
 हडपसर(पुणे) येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार
हडपसर (पुणे) येथे गवंडय़ाने त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या तेरा वर्षांच्या मुलीस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
शंकर उमला पवार (वय २०, रा. फुरसुंगी, ता. हवेली, मूळ- आंध्रप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पवार हा गवंडीकाम करतो. पीडित मुलगी गेल्या पाच महिन्यांपासून त्याच्याहाताखाली काम करते. आरोपीने या मुलीस लग्नाचे आमिष दाखवून त्याच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या आईला हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्याद देण्यात आली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. ढमढेरे हे अधिक तपास करत आहेत.

case against father, father abusing daughter,
मुंबई : पाच वर्षांपासून मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
school van driver rapes school girl
पुण्यातील वानवडी लैंगिक अत्याचार प्रकरणात वापरलेल्या स्कूल व्हॅनची तोडफोड
Lizard fell in curry, people in poisoned Bhandara,
धक्कादायक… भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात ५१ जणांना विषबाधा
road affected, beneficiaries, Kalyan,
कल्याणमधील १६५ रस्ते बाधितांमधील पाच लाभार्थींना मिळाली २४ वर्षांनी घरे
death of youth, procession, Vadgaon Sheri, Pune,
पुणे : मिरवणुकीत तरुणांच्या मृत्यू प्रकरणी मंडळाच्या अध्यक्षासह चौघांवर गुन्हा, वडगाव शेरीतील दुर्घटना
Student died Borivali , dumper, mumbai,
बोरिवलीमध्ये डंपरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू
60 feet road at chinchpada in kalyan east in worse condition
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील ६० फुटी रस्त्याची दुर्दशा; शाळकरी विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल