पुणे : इंटरनेट पुरवठादार परवाना मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेची २० लाख ९२ हजार ३९९ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी तक्रारदार महिलेकडे मंत्रालयात लिपिक असल्याची बतावणी केली होती.

याबाबत एका ४३ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आाहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुनील नामदेव गडकर, किरण सुनिल गडकर (दोघेरी रा. भिंताडे नगर, आंबेगाव) यांच्यासह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला भारती विद्यापीठ भागात राहायला आहे. तक्रारदार महिला आणि त्यांच्या पतीची आरोपींशी एका व्यायामशाळेत ओळख झाली. त्यावेळी आरोपी सुनील गडकरने मंत्रालयात लिपिक असल्याची बतावणी त्यांच्याकडे केली होती. मंत्रालयात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी त्याने केली होती.

fraud of 46 lakh with women by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून महिलांची ४६ लाखांची फसवणूक
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Offensive video viral of female police sub inspector Nagpur news
महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आक्षेपार्ह ‘व्हिडिओ व्हायरल’
cyber crime
सायबर गुन्हेगारांकडून खरेदीसाठी आमिष दाखवून फसवणूक
Fraud of 34 lakh rupees by getting caught in a honey trap vasai crime news
‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकवून वृध्दाची फसवणूक; एका अश्लील क्लिपसाठी उकळले ३४ लाख रुपये
Woman poisons boyfriend thinking he would inherit ₹252 crore.
Woman poisons Boyfriend : २५२ कोटींसाठी बॉयफ्रेंडवर विषप्रयोग, हत्या झाल्यानंतर गर्लफ्रेंडवर पश्चातापाची वेळ! नेमकं काय घडलं वाचा
Funny video Woman on instagram got 30 million views video viral on social media
ना अश्लील डान्स ना स्टंटबाजी; तरी ३० कोटी लोकांनी का पाहिला असावा हा VIDEO? महिलेने असं काय केलं तुम्हीच पाहा
cyber fraud
धक्कादायक! ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे म्हणत तरुणीला कॅमेऱ्यासमोर विवस्र होण्यास भाग पाडलं; ५ लाख रुपयेही उकळले

हेही वाचा – वक्फ सुधारणांबाबत केंद्रीय मंत्र्याचे भाष्य; म्हणाले, “अपप्रचार नको…”

इंटरनेट पुरवठादारासाठी लागणारा परवाना (आयएसपी सी क्लास) मिळवून देतो, असे आमिष त्याने दाखविले. आरोपी सुनील गडकर, त्याची पत्नी किरण आणि साथीदार महिलेने तक्रारदाराकडून २० लाख ९२ हजार ३९९ रुपये घेतले. त्यानंतर त्यांना परवाना मिळवून दिला नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत.

हेही वाचा – केंद्र सरकारवर दहा वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही… केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे पुण्यात विधान

आरोपी गडकर दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचे दोन गुन्हे

आरोपी सुनील गडकर याच्याविरुद्ध विश्रामबाग आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत. म्हाडाच्या गृहप्रकल्पात विशेष कोट्यातून सदनिका मिळून देण्याच्या आमिषाने गडकर आणि त्याच्या पत्नीने कर्वेनगर भागातील एका महिलेची ३८ लाखांची फसवणूक केली होती.