पुणे : अनैतिक संबध उघड करण्याची धमकी देऊन एकाकडे २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मिनल अविनाश दीक्षित (वय ३०, रा. मानकर काॅलनी, हडपसर) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण आणि आरोपी मिनल यांची चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

त्यानंतर तिने गर्भवती असल्याची बतावणी तरुणाकडे केली. ‘माझ्याशी संपर्क तोडल्यास अनैतिक संबंध उघड करेल. तुझ्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करेल. माझ्याबरोबर असलेले संबंध कायम ठेवावे लागतील,’ असे सांगून तरुणाकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली. तिच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा