पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी २० लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. हा निधी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> उदय सामंत म्हणाले, राज्यात राजकीय परिस्थिती कितीही उलटसुलट असली तरीही…

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या नियोजनासंदर्भात अजित पवार यांनी बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी ही घोषणा केली. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> कपड्याच्या दुकानाच्या माहितीपत्रकावरून लागला फरार सोनाराचा शोध; पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन असा लावला छडा

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी शासनातर्फे १० कोटी रुपये देण्यात येणार आहे. या संमेलनासाठी आमदार निधीतून प्रस्ताव आल्यास मान्यता देण्यात येईल. नाट्य संमेलनासाठी मंडप अत्यंत उत्तम दर्जाचा असावा. नाट्य कलावंतांना आवश्यक सर्व सुविधा पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उपलब्ध करून द्याव्यात, असे पवार यांनी सांगितले. संमेलनासाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही संमेलनाला सहकार्य करण्यात येईल, असे उदय सामंत यांनी सांगितले. भाऊसाहेब भोईर यांनी नाट्य संमेलनाची माहिती दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 lakhs fund from dpc for natya sammelan in pimpri says ajit pawar pune print news apk 13 zws