शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन महिन्याच्या अखेरीस करण्यात येणार आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करून त्यामध्ये धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सध्या ९७.२२ टक्के पाणीसाठा आहे.

हेही वाचा >>>पुणे: तुम्हाला डेटिंगसाठी मुलगी हवी आहे का? फोन करत ७९ वर्षीय व्यक्तीची तब्बल १७ लाखांची फसवणूक

BMC Budget 2025 Live Updates
कचरा संकलन शुल्काचा मुंबईकरांवर भार? महापालिकेचा आज अर्थसंकल्प
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Thane Water Cut Supply Disrupted Due to Power Outage at Temghar Pumping Station
ठाणेकरांपुढे पाणी संकट; टेमघर पाणी पुरवठा केंद्रातील वीज यंत्रणेत बिघाड 
vasai virar municipal corporation Planning of development plan according to 10 sectors
विकास आराखड्याचे १० विभागानुसार नियोजन, आरक्षित भूखंडावर अतिक्रमणाबाबत महापालिकेचे मौन
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?
Replantation of 2097 trees for Thane Municipal Headquarters
६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव; ठाणे महापालिका मुख्यालयासाठी २०९७ वृक्षांचे पुनर्रोपण
Pune Municipal Corporation has decided to make it mandatory for tanker drivers to obtain license
पाणी नक्की कुठून घेतले, कुठे दिले हे सांगावे लागणार!
property tax defaulters in pune news in marathi
अभय योजनेचा फायदा घेणारेच झाले पुन्हा थकबाकीदार, नक्की प्रकार काय ?

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत धरणांमधील पाण्याचे वर्षभराचे नियोजन करण्यात येत असते. जलसंपदामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असते. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जलसंपदा खाते आहे. याबरोबरच त्यांच्याकडे अन्य महत्त्वाच्या चार-पाच खात्यांचा कार्यभार आहे. त्यामुळे यंदा कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. जिल्ह्यातील तीन ते चार अपवाद वगळता उर्वरित सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यानुसार धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्यातून रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पाणीवाटपाबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात येत असतो.

हेही वाचा >>>पुणे:सदनिकेचे कुलूप तोडून अडीच लाखांचा ऐवज चोरला

दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमध्ये मिळून एकूण २८.३४ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९७.२२ टक्के पाणीसाठा आहे. यापैकी पानशेत धरणांत अद्यापही १०० टक्के पाणीसाठा असून उर्वरित टेमघर धरणात ९७.३० टक्के, वरसगाव धरणात ९९.७७ आणि खडकवासला धरणात ६५.४८ टक्के पाणीसाठा आहे.

याबाबत जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाले म्हणाले, ‘यंदा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीसह जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात येणार आहे. ही बैठक लवकरच होणार असून त्यामध्ये धरणांमधील पाणीसाठ्याचे नियोजन यांसह विभागाशी संबंधित इतर विषयांवरही चर्चा होईल.’

हेही वाचा >>>भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यूगंगाधाम रस्त्यावर अपघात

शहराच्या वाढीव पाण्याबाबत चर्चा
पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात पाणी वाटपावरून दरवर्षी वाद होत असतो. पुणे महापालिकेने यंदाच्या वर्षीपासून वर्षाला तब्बल २० टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. ही मागणी मंजूर करण्याबाबत महापालिका आग्रही आहे. मात्र, जलसंपदा विभागाने शहराच्या पूर्व भागाला भामा-आसखेड धरणाचे पाणी दिले जात असल्याने जेवढे पाणी भामा-आसखेड प्रकल्पामधून पुणे महापालिका घेते, तेवढे पाणी खडकवासला धरणातून कमी घ्यावे, याबाबतचा आग्रह धरला आहे. पुण्याला ११.५० टीएमसी म्हणजेच दररोज ८९२ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणी कोटा मंजूर आहे. या बैठकीत या विषयावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

Story img Loader