टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शिवणे परिसरात घडली. या प्रकरणी टेम्पोचालकास अटक करण्यात आली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
साहिल रेवननाथ वाळुंज (वय २०, रा. देशमुखवाडी, शिवणे) असे मृ्त्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पो चालक पांडुरंग लक्ष्मण दाभाडे (वय ३३, रा. कोथरूड) याला अटक करण्यात आली. पोलीस शिपाई सागर जगताप यांनी याबाबत वारजे पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार वाळुंज शिवणे भागातील एनडीए मैदानासमाेरून निघाला होता. त्या वेळी भरधाव टेम्पोने त्याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या वाळुंजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
First published on: 30-03-2022 at 15:48 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 year old biker died in road accident pune print news scsg