लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने थकीत कर वसूल करण्यावर भर दिला आहे. २०२३-२४ चालू आर्थिक वर्षातील साडेसहा महिन्यात २०१ कोटी रुपयांची जुनी थकबाकी वसुली केली आहे. ४१ हजार ३०७ जणांना जप्ती नोटीसा तर ३६ हजार ७१९ मालमत्ता धारकांना जप्ती पत्रे धाडली आहेत. जप्त मालमत्तांचा आता लिलाव करण्यात येणार आहे.
शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा सहा लाख सात हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. आतापर्यंत ६०४ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. आता थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी तीव्र मोहीम हाती घेण्यात आली असून थकबाकीदार तत्काळ थकीत कर भरत आहेत.
आणखी वाचा-बारामतीत कटफळजवळ पुन्हा विमान कोसळले, चार दिवसातली दुसरी घटना
शहरातील मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी होती. थकबाकी वसूल होत नसल्याने दरवर्षी हा आकडे वाढतच होता. त्यामुळे जुनी थकबाकी वसूल करण्यावर भर दिला. थकबाकीदारांचा चालू कर आणि थकीत कर भरण्याकडे कल वाढत असल्याने २०२२-२३ आणि २०२३-२४ मध्ये आतापर्यंत ५५५ कोटी रुपयांची जुनी थकबाकी वसूल केली आहे. यामध्ये प्रामुख्याने निवासीसह बड्या थकबाकीदार बिगर निवासी मालमत्ता धारकांकडून कर वसूल केला आहे. कर संकलन विभागाने ४१ हजार ३०७ जणांना जप्ती नोटीसा तर ३६ हजार ७१९ मालमत्ता धारकांना जप्ती पत्रे धाडली आहेत. या मालमत्ता धारकांकडे ६०० कोटी रुपयांचा कर थकीत असल्याचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.
जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. जप्ती मोहीम कशा पद्धतीने राबवता येईल याचा कालबद्ध कार्यक्रम आखून देण्यात आला आहे. शहरात चालू असलेले सर्वेक्षण महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत क्रांतिकारी ठरणार आहे. त्यात कुठल्या त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले.