पुणे : चाकणमधील मेफेड्रोन विक्री प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीला खेड न्यायालयात सुरुवात झाली. या प्रकरणात अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यात ७ ऑक्टोबर २०२० रोजी २० किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले होते. या प्रकरणात ललित पाटीलसह वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात आठ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उर्वरित बारा आरोपी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाला असून, सरकार पक्षाकडून तक्रारदार पोलिस अधिकारी शाकीर जिनेरी यांची साक्ष नोंदविण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in