पुण्यातील हडपसर भागात गांजा विक्री प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी सव्वाचार लाख रुपयांचा २१ किलो गांजा, मोबाइल संच, मोटार असा दहा लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- चारित्र्याच्या संशयातून अभियंत्याकडून पत्नीचा खून; पुण्यातील हडपसर भागातील घटना

या प्रकरणी अक्षय भीमा गाडे (वय २५, रा. शिवाजीनगर, नालेगाव, अहमदनगर) याच्यासह एका महिलेला अटक करण्यात आली. हडपसर भागात महिला आणि साथीदार मोटारीतून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने संशयित मोटार अडवली. मोटारीची तपासणी केली. तेव्हा मोटारीत ठेवण्यात आलेल्या पिशवीत गांजा सापडला. गाडे आणि महिलेकडून २१ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक एस. डी. नरके, दिगंबर चव्हाण, संतोष देशपांडे, संदीप शेळके, प्रशांत बोमादंडी आदींनी ही कारवाई केली.