राज्य मंत्रिमंडळातील २१ मंत्र्यांवर विविध प्रकारचा ठपका ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतले असते तर त्या सर्व मंत्र्यांना तुरुंगाची हवा खावी लागली असती, अशी टीका शिवसेनेचे संपर्कनेते व खासदार गजानन कीर्तिकर यांनी चिंचवड येथे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना केली. विधानसभा निवडणुकीत ‘मिशन १७१’ पूर्ण करायचे आहे, अशी सूचक टिप्पणीही त्यांनी केली.
संपर्कप्रमुख झाल्याबद्दल कीर्तिकरांचा, तर खासदार झाल्याबद्दल श्रीरंग बारणे यांचा शहर शाखेतर्फे सत्कार करण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ, मच्िंछद्र खराडे, भगवान वाल्हेकर, शहरप्रमुख राहुल कलाटे, विजय फुगे, योगेश बाबर, गटनेत्या सुलभा उबाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कीर्तिकर म्हणाले,की देश काँग्रेसमुक्त झाला. आगामी निवडणुकीत महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायचा आहे. राज्यात सर्वात जास्त भ्रष्टाचार सिंचनात आहे, त्यामागे अजित पवारच आहेत. मंत्रिमंडळातील २१ मंत्र्यांवर ‘ठपके’ असून मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतल्यास ते सर्व तुरुंगात जातील. शिवसेनेला ‘मिशन १७१’ पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करावे लागेल. गेल्या वेळी पराभव झालेल्या बारा जागांपैकी १० जागांवर शिवसेना निश्चितपणेजिंकेल. मावळ लोकसभेतील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आणू, असा विश्वास खासदार बारणेंनी व्यक्त केला.

Story img Loader