नगर रस्त्यावरील वाघोली ते लोहगांव येथून पिंपरी-चिंचवड शहराला जोडणाऱ्या ५.७ किलोमीटर लांबीच्या वर्तुळाकार मार्गाचे काम महापालिकेकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी २११ कोटींचा खर्च अपेक्षित असून खर्चाला पूर्वगणन समितीनेही मान्यता दिली आहे. या वर्तुळाकार मार्गामुळे वडगांवशेरी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी- पीपीपी या तत्त्वावर वर्तुळाकार मार्गाचे काम करण्यात येणार असून विकसकाला क्रेडिट नोट देण्याचे प्रस्तावित आहे.

हेही वाचा >>>साखर कारखान्यांना केंद्राचे आर्थिक बळ ; इथेनॉलच्या खरेदी दरात सरासरी दोन रुपयांनी वाढ

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड

महापालिकेच्या हद्दीलगतच्या भागातून वर्तुळाकार मार्ग प्रस्तावित आहे. त्यासाठी भूसंपादन आणि सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा वर्तुळाकार मार्ग ६५ मीटर रुंदीचा असून तो वाघोली-लोहगांवमार्गे पिंपरी-चिंचवड शहरात जात आहे. त्यामुळे नगर रस्त्यावरील वडगांवशेरी, खराडी, येरवडा परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. सल्लागाराकडून त्याचा अहवाल करण्यात आला असून खर्चाला पूर्वगणन समितीनेही मान्यता दिली आहे. सेवा रस्त्याचे कामही महापालिकेकडून करण्यात येणार आहे. तसेच पावसाळी गटारे आणि विद्युत व्यवस्था करण्यात येणार आहे. या कामासाठी २१२ कोटी रुपये खर्च असून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर क्रेडिट नोटच्या माध्यमातून हा रस्ता विकसित करण्यात येणार आहे.