८० हजार कर्मचारी कामावर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रे सोडून इतर ठिकाणचे तब्बल २१६९ उद्योग, व्यवसाय सुरू झाले आहेत. सुरू करण्यात आलेल्या उद्योगांमध्ये ८० हजार कर्मचारी कामावर जात असल्याची नोंद उद्योग विभागाकडे झाली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निश्चित केलेली प्रतिबंधित क्षेत्रे वगळून उद्योग, व्यवसाय सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार पिरंगुटमधील आठशे लहान-मोठे उद्योग, तळेगाव, नगर रस्त्यावरील सणसवाडीसह इतर परिसरातील उद्योग, सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर, नसरापूर आणि कोंढणपूर परिसर, चाकण औद्योगिक क्षेत्रातील तीनही टप्पे (फेज), रांजणगाव औद्योगिक क्षेत्र असे २१६९ उद्योग, व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्य़ातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) ८० मोठे उद्योग, तर एमआयडीसी बाहेरचे ८९ मोठे उद्योग सुरू झाले आहेत. यांसह लहान स्वरूपातील असे मिळून २१६९ एवढे उद्योग, व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. या सुरू करण्यात आलेल्या उद्योग, व्यवसायांमधून ८० हजार कर्मचारी कामावर जात आहेत, अशी माहिती उद्योग पुणे विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
या सुरू करण्यात आलेल्या उद्योगांमध्ये दोन लाख ४२ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, बरेचसे कर्मचारी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांत किंवा जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील प्रशासनाने प्रतिबंध केलेल्या क्षेत्रातील असल्याने सध्या ८० हजार कर्मचारीच कामावर जात आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्याला असलेल्या आणि प्रतिबंध क्षेत्राच्या बाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर ने-आण करण्यासाठी संबंधित उद्योगांनी वाहतूक व्यवस्था करायची आहे, तर ग्रामीण भागात कामावर असलेल्या उद्योग, व्यवसायाच्या जवळच राहण्यास असलेल्यांना स्वत:ची खासगी वाहने घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. उद्योग सुरू असलेला एखादा भाग प्रतिबंध क्षेत्र जाहीर केल्यास पुन्हा तेथील उद्योग बंद करण्यात येणार आहेत, असेही सुरवसे यांनी स्पष्ट केले.
माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसाठी व्यवस्था
हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याची मुभा दिली आहे. हीच व्यवस्था पुढील काही दिवस कायम राहणार आहे. मात्र, कंपन्यांमध्ये आवश्यक असलेल्या पाच ते दहा अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे, तर घरी बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लॅपटॉप, संगणक बिघडण्यासह इतर तांत्रिक अडचणी येत असल्यास दुरुस्तीसाठी कर्मचारी पाठवण्याची व्यवस्था केली आहे. कंपन्यांच्या मुख्यालयात काही यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी परवाने देण्यात येत आहेत, असेही उद्योग सहसंचालक सुरवसे यांनी सांगितले.