रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेच्या पथ विभागाने गेल्या दहा वर्षांत तब्बल २२१ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. दरवर्षी महापालिकेच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने हा खर्च उधळपट्टीच ठरला आहे. गेल्या दहा वर्षांत रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेच्या पथ विभागाला ३४१ कोटींची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली. त्यापैकी २२१ कोटींचा खर्च रस्ते दुरुस्तीवर करण्यात आला आहे. रस्ते दुरुस्तीसाठीची १२० कोटींची रक्कम खर्च करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने रस्ते दुरुस्ती, डांबरीकरणाची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी उपलब्ध करून दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून रस्ते दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असला, तरी रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे दरवर्षी शेकडो कोटी रुपये खर्च केल्यानंतरही रस्ते योग्य पद्धतीने दुरुस्त का होत नाहीत, अशी विचारणा नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा