पुण्यात यंदाच्या गणेशविसर्जन मिरवणुकीदरम्यान लेझर बीममुळे जवळपास १५ नागरिकांच्या डोळ्यांना इजा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी एक असलेल्या जनता वसाहत भागात राहणाऱ्या २३ वर्षीय अनिकेत शिगवण याची दृष्टी लेझर बीममुळे जवळपास ७० टक्के अधू झाल्याची घटना घडली आहे.
हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडमध्ये पाच पिस्तुले आणि दहा जिवंत काडतुसे जप्त
या घटनेबाबत अनिकेत शिगवण म्हणाला की, मी दरवर्षी गणरायाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत डान्स करीत आलो आहे. मला कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. परंतु, यंदा गणेशविसर्जनाच्या मिरवणुकीत जवळपास तीन तास नाचलो. त्यावेळी अचानक मला अंधुक दिसायला लागले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेल्यावर अनेक तपासण्या केल्या. त्यामध्ये नजरेवर जवळपास ६० ते ७० टक्के परिणाम झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी काय करावे सुचले नाही. पण मी आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता उपचार सुरू असून, यातून लवकरच बाहेर पडेन, असा विश्वास त्याने व्यक्त केला. राज्य सरकारने लेझर बीमवर बंदी आणावी, अशी मागणीदेखील त्याने केली आहे.
हेही वाचा >>> पिंपरी : कुदळवाडीत भंगाराच्या वादातून मित्राचा खून, मृतदेह जंगलात टाकला
अनिकेतवर उपचार करणारे दुधभाते नेत्रालयाचे डॉ. अनिल दुधभाते म्हणाले की, विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी अनिकेत शिगवण हा तरुण आमच्याकडे उपचारासाठी आला आणि एका डोळ्यानं खूप अंधुक दिसत असल्याची तक्रार त्यानं केली होती. त्यावर आम्ही सर्व तपासण्या केल्यावर विसर्जन मिरवणुकीत अनिकेत नाचत होता. त्यावेळी त्याच्या डोळ्याच्या मागील बाजूवर लेझर बीमचा घात झाल्यानं, त्या ठिकाणी रक्तस्राव झाला आणि त्यामुळे अनिकेतला ६० ते ७० टक्के अंधुक दिसत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आम्ही विविध ड्रॉप्स दिले असून, उपचार सुरू आहेत. आता पुन्हा तीन दिवसांनी काही तपासण्या करून, पुढील उपचार केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, अनिकेतसारखा अनेकांना त्रास झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने लेझर बीमवर बंदी आणली पाहिजे; जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणे टळू शकेल. त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.