पुणे : राज्याच्या अंतरिम अंदाजपत्रकामध्ये पुणे मेट्रो प्रकल्पासाठी २३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ७०० कोटींची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, पुण्यासह राज्यातील मुंबई, नागपूर मेट्रेसाठी एकूण १ हजार ३१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मार्गिकांची कामे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून वेगात सुरू झाली आहेत. हे दोन्ही मार्ग ३२ किलोमीटर लांबीचे असून त्यासाठी ११ हजार ४२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मेट्रो प्रकल्पासाठी पुणे महापालिका, राज्य शासन आणि केंद्र सरकारकडून वित्तीय साहाय्य काही प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार असून उर्वरित निधी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून उभारण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून एक हजार ३१० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

पुणे मेट्रोसाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून एकूण ७०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी २३० कोटी रुपये मेट्रो प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आले आहेत. मागणीपेक्षा निधी कमी प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. नागपूर मेट्रोकडून ५३९ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या मेट्रो प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यापूर्वी २४८ कोटींचा निधी

नवे वर्ष सुरू होताना जानेवारी महिन्यात २४८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश राज्य शासनाने काढले होते. त्यात राज्य शासनाचा समभाग म्हणून २१८ कोटी आणि दुय्यम अनुदान म्हणून ३० कोटी अशा एकूण २४८ कोटी रुपयांच्या रकमेचा समावेश आहे.