पुणे : नगरमधून अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे-सोलापूर रस्ता परिसरातून अटक केली. त्याच्याकडून २४ लाख रुपये किंमतीचे दोन किलो चरस जप्त करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>मटण खाऊन देवदर्शन केल्याचा विजय शिवतारेंचा आरोप; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “यासंदर्भात मी…”

औरंगजेब पप्पू अन्सारी उर्फ रंगा परदेशी (वय २७, रा. नगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील उरळी कांचन परिसरात गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्या वेळी एक जण चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे असलेल्या पिशवीत चरस सापडले.

परदेशीकडून दोन किलो चरस जप्त करण्यात आले असून जप्त करम्यात आलेल्या चरसची किंमत २४ लाख रुपये आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक शुभांगी नरके, योगेश मांढरे, युवराज कांबळे, संतोष देशपांडे, संतोष जाधव आदींनी ही कारवाई केली.z

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 lakh worth of drugs seized from one in the city pune print news rbk 25 amy