पुण्यात तब्बल दीड महिने उशिराने सुरू झालेल्या पावसाने अखेर रडतखडत का
दरम्यान, पुण्यात पुढील दोन दिवसातही आतासारखाच चांगला पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागाप्रमाणेच पुण्यात या वेळी पावसाने मोठी वाट पाहायला लावली. विशेषत: १ जूनपासून पहिल्या दीड महिन्याच्या काळात अगदीच नाममात्र पाऊस पडला होता. त्यानंतरही हलक्या सरीच बरसत होत्या. मात्र, गेल्या तीन-चार दिवसात पुण्यात पावसाने चांगलाच वेग धरला. त्यामुळे पावसाची नोंद झपाटय़ाने वाढली. मंगळवारी दिवसभरात पुण्यात पावसाने शंभरी गाठली. पुणे वेधशाळेत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अखेर १०५ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. पुण्यात सोमवारी जोरदार पाऊस पडला. सोमवारी सकाळी साडेआठ ते मंगळवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान २६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर मंगळवारीसुद्धा पावसाचा जोर कायमच होता. पावसाच्या मोठय़ा सरींनीच दिवसाची सुरुवात झाली. पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर अधूनमधून थांबत थांबत मोठय़ा सरी पडत होत्या. आताच्या हंगामातील चांगल्या सरी गेल्या दोन दिवसात पडल्या.
शंभरी गाठली तरी सरासरीनुसार, पुणे शहरात आतापर्यंत सुमारे पावणेतीनशे मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. त्या तुलनेत पुण्यात अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. पुढील दोन दिवसात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुण्यातील पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. आताच्या पावसाला कारणीभूत असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. शिवाय ते पश्चिमेकडे सरकत आहे. याचा परिणाम पुण्यात पावसाची वाढ होण्यास झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात पावसाची आणखी तूट भरून निघेल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालक डॉ. मेधा खोले यांनी सांगितले.
पुण्याच्या पावसाची शंभरी!
१ जूनपासून ते मंगळवारी (२२ जुलै) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे वेधशाळेत १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शंभरी गाठली असली तरी आतापर्यंतच्या पावसाची तूट तब्बल पावणेदोनशे मिलिमीटरची आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-07-2014 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 percent water in pune region dams