पुणे : डॉक्टरांनी एका ५० वर्षीय व्यक्तीच्या पायातील २५ सेंटीमीटरची गाठ यशस्वीपणे काढून टाकली. या रुग्णाच्या डाव्या पायाला असलेल्या गाठीमुळे त्याला जास्त वेळ उभे राहता येत नव्हते आणि पायाला सूजही येत होती. गाठीने पायाच्या मज्जातंतूंना व्यापल्याने पाय वाचण्याची शक्यता कमी होती. मात्र, डॉक्टरांनी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाचा पाय वाचवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रघुनाथ गावडे (नाव बदलले आहे) या रिक्षा चालकाच्या पायातून गाठ काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले. ते पुण्यातील रहिवासी आहेत. डाव्या पायाला मोठ्या आकाराची गाठ आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यामुळे त्यांना सातत्याने वेदना होत होत्या. त्यामुळे त्यांना पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावडे यांच्या तपासणीत पायाला सुमारे सहा महिन्यांपासून वेदना होत असल्याचे निदर्शनास आले. पायातील गाठीने त्यांच्या मज्जातंतूना व्यापले होते. त्यामुळे त्यांचा पाय वाचण्याची शक्यता कमी होती.

आणखी वाचा-पुणे : लष्कर भागातील हॉटेलला आग; कामगार पळाल्याने अनर्थ टळला

अखेर त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्करोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत चंद्रा आणि कर्करोग शल्यचिकित्सक विभागाचे प्रमुख डॉ. समीर गुप्ता यांनी ही शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रिये दरम्यान, पायांच्या स्नायूंना पुरवठा करणाऱ्या मज्जातंतूंना वाचविण्यास त्यांनी प्राधान्य दिले. मज्जातंतूंचे नुकसान झाले असता त्यांना कायमचा अर्धांगवायू येऊन अपंगत्व आले असते. ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने शस्त्रक्रियेसाठी सुमारे तीन तासांहून अधिक कालावधी लागला. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण बरा झाला. त्याला चालता येणे शक्य झाल्याने सात दिवसांच्याउपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 cm tumour was removed from the leg of the rickshaw driver pune print news stj 05 mrj
Show comments