पुणे : दौंड स्थानकादरम्यान सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामामुळे १३ ते २९ मे या कालाधीत जवळपास २५ गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

सोलापूर-पुणे डेमू, मुंबई-पंढरपूर एक्स्प्रेस, पुणे-दौंड डेमू, दौंड-बारामती डेमू, दौंड-पुणे डेमू, दौंड-पुणे शटल, बारामती-पुणे डेमू, पुणे-बारामती डेमू, सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर डेमू, पुणे-भुसावळ स्पेशल, बारामती-दौंड डेमू, भुसावळ-पुणे स्पेशल, दौंड-बारामती डेमू, पुणे-निझामाबाद डेमू, पुणे-दौंड डेमू, दौंड-पुणे-दौंड, निजामाबाद-पुणे डेमू, बारामती-दौंड पॅसेंजर, निजामाबाद-पंढरपूर डेमू, पंढरपूर-निजामाबाद डेमू या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.

तसेच काही गाडय़ा निम्म्यापर्यंत धावणार आहेत. त्यामध्ये इंदूर दौंड एक्स्प्रेस पुण्यापर्यंत, दौंड-ग्वाल्हेर एक्स्प्रेस पुण्यापर्यंत, हैदराबाद-हडपसर एक्स्प्रेस बार्शीपर्यंत, बेंगळुरू-मुंबई उद्यान एक्स्प्रेस सोलापूपर्यंत, नांदेड पनवेल एक्स्प्रेस कुर्डुवाडीपर्यंत या गाडय़ांचा समावेश आहे.

या गाडय़ा निर्धारित वेळेत धावतील

दौंड-इंदूर एक्स्प्रेस पुणे स्थानकाहून, ग्वाल्हेर-दौंड एक्स्प्रेस पुण्यातून, हडपसर हैदराबाद एक्स्प्रेस बार्शी टाऊन स्थानकाहून, मुंबई- बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस सोलापुरहून, पनवेल नांदेड एक्स्प्रेस कुर्डुवाडीहून निर्धारित वेळेत धावणार आहेत.

Story img Loader