पिंपरी: प्रेयसीला अपशब्द वापरला म्हणून पोटच्या मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केला आहे. ही घटना दिघी येथे रविवारी (दि.५) रात्री उशीरा घडली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणासह त्याच्या भावा आणि आईविरोधातही गुन्हा नोंदविला आहे.
हेही वाचा >>> पुणे- धुळवडीला मार्केट यार्डातील आंबेडकरनगरमध्ये गोळीबार, दोन गटात हाणामारी
अशोक रामदास जाधव (वय ४५) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर, मुख्य आरोपी अनिल अशोक जाधव (वय २३) यासह राहुल अशोक जाधव (वय २५) या मोठ्या भावालाही गजाआड करण्यात आले आहे. त्यांच्या आईवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनिल याचे एका मुलीशी प्रेमसंबंध आहेत. त्या मुलीविषयी वडिल अशोक यांनी अपशब्द वापरले. याचा राग आल्याने अनिलने घरातील दोरीने गळा आवळून वडिलांचा खून केला.
हेही वाचा >>> पुणे : पीएमआरडीएच्या गृहयोजनेतील सदनिकांची होणार ई-नोंदणी
घटनेनंतर त्याच्या आईने फरशीवर पडलेले रक्ताचे डाग पुसत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तर, अनिलचा मोठा भाऊ अशोक याने वडिलांचा मृतदेह घरातील छताच्या पंख्याला अडकवून आत्महत्या केल्याचा बनाव रचला. या खूनप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.