पुणे : शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी मध्यरात्रीनंतर वेगवेगळ्या भागात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. वसाहतीत पाणी शिरल्यानंतर तातडीने रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविणे, तसेच वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर तातडीने धाव घेऊन मदतकार्य करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचे काम कौतुकास पात्र ठरले. पाणी शिरलेल्या भागात तातडीने मदतकार्य करून जवानांनी २५४ जणांची सुटका केली.

शहरात बुधवारी रात्रीनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. सलग बारा तास मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील वेगवेगळ्या भागात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. गुरुवारी सायंकाळी पाचपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात ७८ ठिकाणी झाडे पडली. सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी सोसायटीसह शहरातील २५ ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. मुसळधार पावसामुळे जुन्या घराच्या भिंत पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. बुधवारी रात्रीपासून अग्निशमन दलाच्या २० अधिकाऱ्यांसह २०० जवान मदतकार्यात सहभागी झाले होते. वेगवेगळ्या भागात झाडे कोसळणे, तसेच पाणी शिरण्च्या घटना एकापाठोपाठ घडल्याने धावपळ उडाली, असे अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham Again Collection
‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवडमधील १५ रस्त्यांवरील वाहतूक बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण केंद्रातील दूरध्वनी रात्रभर खणाणत होते. नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी मदतकार्यात भूमिका बजावली. त्वरीत अग्निशमन दलाचे बंब, जवानांना घटनास्थळी रवाना करण्याच्या सूचना देण्यात आला. पावसाळ्यातील दिवस म्हणजे अग्निशमन दलाच्या जवाानांच्या दृष्टीने युद्धाचे प्रसंग असतात, असे त्यांनी नमूद केले.

पोलिसही मदतकार्यात सहभागी

भिडे पुलासह शहरातील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. काही रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. भिडे पूल, जयंतराव टिळक पूल, होळकर पूल, शांतीनगर पूल, मांजरी पूल वाहतुकीस बंद करण्यात आले होते. तेथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाणी शिरलेल्या भागात पोलिसांनी ध्वनीवर्धकावरुन सूचना दिल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी सहकार्य करून तातडीने रहिवाशांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविले. काही भागात रस्त्यावर पाणी साचले होते. या भागातील ड्रेनेजमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. महापालिका कर्मचाऱ्यांना या बाबतची माहिती देऊन वाहतूक सुरळीत केली.