लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : तुम्ही पाठवलेल्या कुरियरमधून मुदत संपलेले पारपत्र (पासपोर्ट), ड्रग्ज असल्याचे सांगत तसेच आधार नंबर बेकायदेशीर कृत्यासाठी वापरला जात असल्याची भीती दाखवून संगणक अभियंत्याला तब्बल २६ लाखाचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार वाकड येथे उघडकीस आला.

उदय प्रताप शंकर दयाल सिंह (वय ३१, रा. प्रिस्टीन प्रोलाईफ, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोबाइल क्रमांकधारक राहुल देव, प्रदीप सावंत, पंजाब नॅशनल बँक आणि फेडरल बँकेचा खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-जेएन.१ चा धोका वाढला! पाहिल्या लाटेतील ‘टास्क फोर्स’ पुन्हा स्थापन अन् अध्यक्षपदी डॉ. गंगाखेडकर

फिर्यादी उदयप्रताप हे संगणक अभियंता आहेत. २३ डिसेंबर रोजी फिर्यादी यांच्या मोबाइल क्रमांकावर आरोपी राहुल याने फोनकरुन तो फेडएक्स कुरिअरमधून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या नावाने मुंबई ते तैवान असे कुरिअर जात असल्याचे सांगून त्यामध्ये पाच भारतीय व पाच तैवानचे मुदत संपलेले पारपत्र, तसेच, पाच किलोग्रॅम कापड, सहा क्रेडिट कार्ड व ९५० ग्रॅम एमडी असल्याचे खोटे सांगितले. फिर्यादीला ऑनलाइन सायबर तक्रार देण्यास सांगून फिर्यादी यांचा फोन आरोपी प्रदीप याच्याकडे वळविला.

त्यानंतर प्रदीपने फिर्यादीला फोन करुन फिर्यादी यांचा आधार नंबरचा वापर हा बेकायदेशीर कृत्यासाठी वापरला जात असल्याचे सांगितले. फिर्यादी यांचे ३६ बँक खाते असून त्याद्वारे मनी लॉड्रिंग होत असल्याचे भासवले. फिर्यादीला घाबरवून आरोपींच्या पंजाब नॅशनल बँक तसेच फेडरल बँकेच्या खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग पाडून फिर्यादी यांची २६ लाख ६ हजार रूपयांची ऑनलाइन फसवणूक करून रकमेचा अपहार केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 26 lakh fraud with computer engineer by claimed that courier had drugs pune print news ggy 03 mrj
Show comments