पतीच्या छळामुळे महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली. नेहा प्रणय ठाकूर (वय २६ ,रा. जिजाई विहार, मानाजीनगर, नऱ्हे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. नेहाचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पती प्रणय याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पादचारी पुलावर पडणार हातोडा; पुणेकरांच्या ६ कोटींचा चुराडा!
याबाबत राजकुमारी ठाकूर (वय ५५, रा. कोलार रोड, भोपाळ, मध्यप्रदेश) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नेहाचा पती प्रणय गेल्या काही महिन्यांपासून छळ करत होता. घरकामावरुन तिला टोमणे मारुन शिवीगाळ, तसेच मारहाण करण्यात आली. पतीचा छळ असह्य झाल्याने नेहाने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक लाड तपास करत आहेत.