पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घटना घडली.या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५,, रा. शिक्रापूर) हा आरोपी फरार असून त्या आरोपीच्या शोधासाठी आठ पथक रवाना करण्यात आली आहे. तर या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून त्याच दरम्यान पुण्यातील ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट एसटी स्थानकात आंदोलन करण्यात आले.त्यावेळी वसंत मोरे यांनी सुरक्षा रक्षकाची केबिन फोडली.त्यानंतर आगारातील एका बंद पडलेल्या बसेसची झालेली दुरवस्था आणि त्यामध्ये नेमके काय कारनामे चालयाचे,हे वसंत मोरे यांनी दाखवून दिले.त्यामुळे एसटी विभागाचा कशा प्रकारे कारभार चालत असेल असा सवाल उपस्थित करीत प्रशासनाचा त्यांनी निषेध नोंदविला.

आम्हाला लाडक्या बहिणीचे 1500 नको तर संरक्षण द्या,ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांची मागणी आम्हाला राज्य सरकारकडून लाडक्या बहिणीचे 1500 रुपये नकोत,तर आम्हाला संरक्षण द्या,चांगल शिक्षण द्या,पण या गोष्टी सरकारकडून दिल्या जात नाही.यामुळे राज्यातील महिला असुरक्षित आहे.यातूनच स्वारगेट एसटी स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करीत असून राज्याच्या मुख्यमंत्री,गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा आणि या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी,अशी मागणी ठाकरे गटाच्या महिलांनी या आंदोलना दरम्यान केली.

स्वारगेट एसटी स्थानकातील 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्या प्रकरणी,डेपो मधील 23 सुरक्षा रक्षक यांचे तात्काळ निलंबन करण्याचे आदेश,उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश,तर स्वारगेट एसटी डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांचे चौकशी करून एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर केला जाणार, परिवहन आयुक्तांकडे हा अहवाल सादर केल्यानंतर कारवाईचा निर्णय होणार.

Story img Loader