बिबवेवाडी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात एका तरुणाचा डोक्यात दगड  घालून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी एकाला संशयावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बसवराज गजेंत्रे (वय २६, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून, याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

हेही वाचा >>> रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे-मिरज दरम्यान अनेक गाड्या रद्द

anticipatory bail application of illegal school principal rejected by pune court
बेकायदा शाळेच्या मुख्याध्यापिकेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Sangli Crime News
Sangli Crime : सांगलीत १०० रुपयांचं स्क्रिन गार्ड ५० रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाची हत्या, तिघांना अटक
pune crime news
पुणे : भांडारकर रस्त्यावरील बंगल्यात घरफोडी करणारा गजाआड
Shantinagar motorcycle thief , Bhiwandi , Tadi ,
ठाणे : ताडी पिण्यासाठी आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला, मोक्का आणि जबरी चोरीच्या १८ गुन्ह्यात होता फरारी
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
accused akshay shinde encounter
अन्वयार्थ : हत्येचा गुन्हा दाखल कराच
person who came to Thane for selling whale fish vomit ambergris arrested by thane Polices Crime Investigation Branch
वारजे भागात सराईताकडून तरुणावर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सराईत अटकेत

अप्पर इंदिरानगर परिसरात नियोजित व्यापारी संकुलाचे काम सुरू आहे. माजी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांच्या संकल्पनेतून व्यापारी संकुल साकारण्यात येत आहे. त्याठिकाणी गाळे बांधण्यात आले आहेत. एका गाळ्यात तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती ओसवाल यांना मिळाली. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचे समोर आले. बसवराज व्यापारी संकुलात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. बसववराज आणि त्याचे मित्र रविवारी रात्री गाळ्यात दारु पित होते. नात्यातील एका महिलेविषयी बसवराज वाईट बोलला होता. या कारणावरुन मित्राचा बसवराजशी वाद झाला. बसवराजच्या डोक्यात दगड घालून तो पसार झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

Story img Loader