म्हाळुंगे माण नगररचना योजनेच्या (टाउन प्लॅनिंग – टीपी स्कीम) धर्तीवर २७ नगर नियोजन योजना राबविण्यात येणार असून यासाठी २०१९ मध्ये १२ गटांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नगर नियोजनांतर्गत हे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. मात्र, करोनामुळे योजनेला विलंब झाल्याने त्याची पुन्हा तपासणी करण्यात येणार असून नगर योजनेंसाठी इच्छूक असणाऱ्यांकडून नव्याने प्रस्ताव मागिवण्यास सुरुवात झाली आहे.

पीएमआरडीएच्या नगर नियोजनांतर्गत साधारणतः १०० एकर किंवा त्यापेक्षा अधिक भूभागावरील जमीनमालक, सदनिकाधारकांचे एकत्रित प्रस्ताव मागिवण्यात आले आहेत. पीएमआरडीएकडून रस्ते, पाणी, विद्युत पुरवठा, पूल, कचरा प्रकल्प, पावसाळी गटारी, सांडपाणी व्यवस्थापन, क्रीडांगण, उद्याने आदी सुविधा पुरविण्यात येणार असून याअंतर्गत हायटेक शहर विकसित करण्यात येणार आहे.

maharashtra govt gave responsibility to ias officers for developing mmr as a growth hub
‘एमएमआर’च्या विकासाची जबाबदारी नोकरशहांकडे! राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी केंद्राची सूचना अमलात
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Approval of high technology based projects for investment in Cabinet Sub Committee meeting of Industry Department
चार विशाल प्रकल्पांना मान्यता; एक लाख १७ हजार २२० कोटींची गुंतवणूक
is it Municipalities responsible for water supply to large housing projects
मोठ्या गृहप्रकल्पांना पाणीपुरवठ्याची जबाबदारी महापालिकांची?
incomplete work of first phase of concreting road complete by may 2025
सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मे २०२५ ची मुदत; कामे पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
Dangerous schools of Raigad Zilla Parishad continue
रायगड जिल्हा परिषदेच्या धोकादायक शाळा सुरूच
private fm will be started in 234 new city along with chandrapur gondia wardha yavatmal in state
चंद्रपूर,गोंदिया,वर्धा, यवतमाळसह राज्यात या शहरात सुरू होणार खाजगी एफ. एम. सेवा
Water supply shut down on Friday in H West Division Mumbai news
एच पश्चिम विभागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन

दरम्यान, पीएमआरडीएच्या नगर विकास नियोजनातील प्रारूप आराखड्यानुसार २७ नगर नियोजन योजना प्रस्तावित केल्या आहेत. सन २०१९ मध्ये म्हाळुंगे माण नगर नियोजनच्या धर्तीवर १२ गटांकडून प्रस्ताव प्राप्त झाले. मात्र, गेल्या दोन वर्षांच्या काळात करोना प्रादुर्भावामुळे सर्व प्रक्रिया रखडली. सध्या करोना प्रादूर्भाव आटोक्यात आला आहे. परिस्थिती पूर्वपदावर आली असल्याने पीएमआरडीएमार्फत नगर नियोजन योजनेबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या अनुषंगाने नगर रचना नियोजनासाठी ज्या १२ गटांकडून प्रस्ताव प्राप्त झाले होते, त्यांची सहमती आहे किंवा कसे, यासाठी पुन्हा तपासणी सुरू झाली आहे. तर इच्छुकांसाठी देखील नव्याने प्रस्ताव मागविण्यास सुरूवात झाली आहे, अशी माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली.

म्हाळुंगे माण नगर नियोजन योजनेच्या धर्तीवर पीएमआरडीए क्षेत्रातून १२ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी सात प्रस्तावांना सहमती दर्शवून खासगी- सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर मंजुरी देण्यात आली होती. मात्र, करोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे सर्व प्रक्रिया रखडली. सद्य:स्थितीत नगर नियोजन योजनेबाबत नव्याने प्रस्ताव मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जुन्या प्रस्तावांबाबत फेरविचार करून पुन्हा सहमतीबाबत पत्र व्यवहार करण्यात येत आहे, असे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.

पीएमआरडीएकडे प्राप्त प्रस्ताव (क्षेत्रफळ हेक्टरमध्ये)
माण ४०८, वाघोली ५१.५३, वाघोली ३५.०७, देहू निघोज ४८.४५, भुगाव ३६.२१, भुकूम ५५.२४, कार्ला ५८.६३, भावडी ४३.७६,
वडाचीवाडी ४९.७, लव्हळे ५९.३, पठारवाडी ६२.३९, डावजे ७५.०४, कोढूर ९२,२७ असे एकूण ६७०.५९