पुणे : बोपदेव घाटात दुचाकी घसरुन सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीस्वाराला दुखापत झाली. भरधाव दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. गणेश रमेश राठोड (वय २७, रा. शिवकृपा हाऊसिंग सोसायटी, केशवननगर, मुंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अजित पवारांच्या जाहिरनाम्याची अमोल कोल्हेंनी उडवली खिल्ली; म्हणाले, “आम्ही तुम्हाला चंद्र…”

अपघातात दुचाकीस्वार अक्षय अर्जुन मोरे (वय २७, रा. कडनगर, उंड्री, कोंढवा) याला दुखापत झाली असून, भरधाव दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी मोरेविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार दिनेश रासकर यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार अक्षय आणि त्याचा मित्र बोपदेव घाटातून कोंढव्याकडे निघाले होते. सायंकाळी सातच्या सुमारास बोपदेव घाटातील वळणावर दुचाकी घसरली.

हेही वाचा >>> हरवलेले ४१ मोबाइल संच तक्रारदारांना परत; दिवाळीनिमित्त पोलिसांकडून अनोखी भेट

अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी गणेश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुचाकीस्वार अक्षय याला किरकोळ दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या गणेशचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस हवालदार रासकर तपास करत आहेत. बोपदेव घाटात तीव्र उतार आहे. तीव्र उतारावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडतात. यापूर्वी बोपेदव घाटात गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 27 year old youth killed in bike accident in bopdev ghat pune print news rbk 25 zws