पुणे शहरातील २८ लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये रहात असून एकूण अधिकृत झोपडपट्ट्यांची संख्या ३९० एवढी आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या माध्यमातून झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्याचे नियोजित आहे. महापालिकेच्या २०२१-२२ या वर्षीच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालातून ही वस्तुस्थिती पुढे आली आहे.

शहराचा विकास झपाट्याने होत असून शहरात निर्माण होणारे विविध गृहप्रकल्प, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, मल:निस्सारण व्यवस्था, वाहतूक व्यवस्था या सारख्या पायाभूत सोयी-सुविधांमुळे शहरात येण्याचा कल वाढत आहे. स्थलांतर, औद्योगिकीकरण तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे होणारी क्षेत्र वाढ यामुळे शहरीकरण होत आहे. २०११ च्या जनणगणेनुसार शहराची लोकसंख्या ३५ लाख ५६ हजार ८२४ एवढी आहे. विविध कारणांमुळे शहराची लोकसंख्याही वाढत आहे. त्याचबरोबरच शहरातील झोपडपट्ट्यांची संख्याही वाढत आहे, असे पर्यावरण अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Kalyan Viral Video
“कल्याणकरांचं आयुष्य सोपं नाहीय”, कल्याण स्टेशनवरचा ‘तो’ जीवघेणा प्रकार पाहून धक्का बसेल; VIDEO एकदा पाहाच!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
fountain , Chandrapur , mosquitoes,
चंद्रपुरातील कारंजी बनली डास उत्पत्ती केंद्र
Mumbai slum rehabilitation authority is using drones and biometrics to ensure transparent eligibility of slum dwellers
झोपडीधारकांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाला वेग, १३ लाख ८९ हजारपैकी आतापर्यंत ५ लाख ४४ हजार झोपडीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण
Applicants disapproval due to prices for CIDCO preferred houses navi Mumbai news
२६ हजार घरे, १५ हजार अर्जदार; ‘सिडको’च्या पसंतीच्या घरांसाठी दरांमुळे नापसंती
Mumbai Municipal Corporation will levy property tax on commercial slums to boost Revenue starting surveys
झोपडपट्यामधील व्यावसायिक गाळेधारक मालमत्ता कराच्या कक्षेत सुमारे ६०० झोपड्यांना पाठवली देयके
hane rural areas thane district residents homes Central and State government Gharkul scheme
ग्रामीण भागातील १५ हजारहून अधिक रहिवाशांना मिळाले स्वप्नातले घर, केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकूल योजना प्रगतीपथावर
Under Slum Rehabilitation Scheme 16000 flats in Mumbai are set for possession soon
‘झोपु’च्या १६ हजार सदनिकांचा ताबा, घरभाड्या पोटी ३२२ कोटी वसुलीचे उद्दिष्ट

शहरातील अधिकृत झोपडपट्ट्यांची संख्या ३९० एवढी आहे. तर त्यामध्ये १ लाख ४० हजार ८४६ एवढ्या झोपड्या आहेत. त्यामध्ये ७ लाख ४० हजार १८० रहिवासी वास्तव्यास असून लोकसंख्येचा विचार करता २८ टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत राहणारी आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून पुनर्वसनाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत.शहरातील झोपडपट्टी क्षेत्राचे सर्वेक्षण करून त्याचा आढावा घेणे, झोपडपट्टी क्षेत्रांच्या पुनर्वसनासाठी योजना तयार करणे, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

१ जानेवारी २००० रोजी किंवा त्यापूर्वीच्या पात्र झोपडपट्टीधारकास मालकी हक्काचे घर विनामूल्य देण्याचे नियोजित आहेत. या सदनिकेचा आकार २६९ चौरस फूट एवढा निश्चित करण्यात आला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाबरोबरच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतही परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या माध्यमातून १८ हजार ३१८, कर्ज संलग्न अनुदानाच्या माध्मयातून ४१ हजार ७८३, परवडणारी घरांच्या माध्मयातून २ हजार ९१९ आणि सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर ६ हजार प्रकल्प असे एकूण ६९ हजार २० घरांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे.

Story img Loader