प्रथमेश गोडबोले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : महाराष्ट्राच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर तब्बल २८६ अपघातप्रवण क्षेत्रे (ब्लॅक स्पॉट) आहेत. या ठिकाणी गेल्या तीन वर्षांत आतापर्यंत २४०१ अपघात झाले असून, त्यांमध्ये १६०६ जणांना प्राण गमवावा लागला आहे. आता या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवेज् अॅथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) जाहीर केले आहे.
देशभरातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने अपघातांचे सखोल विश्लेषण करण्याची नवीन योजना आखली आहे. या अंतर्गत अपघाताचे ठिकाण, कारण, वेळ, वाहनाचा प्रकार, रस्त्याची अवस्था, हवामानाची परिस्थिती, वाहनचालक, प्रवाशांची माहिती यासह एकूण १७ विषयांची माहिती बारकाईने नोंदवली जात आहे. आतापर्यंत झालेल्या अपघातांपैकी सर्वाधिक अपघात मुंबई-पुणे (चेन्नई) द्रुतगती महामार्ग, पंजाब ते कर्नाटक (धुळे ते सोलापूर) राष्ट्रीय महामार्ग आणि सुरत-मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत, असे एनएचएआयकडून सांगण्यात आले.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच रस्तेसुरक्षा आणि वाहतूक आढावा बैठक पार पडते. त्यानुसार एनएचएआयच्या हद्दीत असणाऱ्या पुणे विभागातील सर्व महामार्गावरील अतिक्रमण काढून रस्ते रुंदीकरण करणे, अपघातजन्य ठिकाणांवरील उपाययोजना, वेग नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून अपघात रोखण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, असे एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले. पुण्यात ३० अपघातप्रवण ठिकाणे महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील सर्वाधिक प्राणांतिक अपघात पुणे जिल्ह्यात झाले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातप्रवण ३० ठिकाणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने नवले पूल, चांदणी चौक आणि हिंजवडी आदी ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणांवर आतापर्यंत ३८६ अपघात झाले असून, त्यामध्ये २२७ जणांचा मृत्यू झाला .