पिंपरी : शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदांच्या २६२ जागांसाठी मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर आता दहा ऑगस्ट रोजी लेखी परीक्षा होणार आहे. ताथवडे येथील श्री बालाजी विद्यापीठात सकाळी दहा वाजता ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी २९८९ उमेदवार पात्र ठरले आहेत. तर, मैदानी चाचणीत १२ हजार उमेदवार बाहेर पडले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात २६२ शिपायांच्या जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी ७९, महिला ७८, खेळाडू १५, प्रकल्पग्रस्त १४, भूकंपग्रस्त चार, माजी सैनिक ४१, अंशकालीन पदवीधर ११, पोलीस पाल्य सात, गृहरक्षक दल १३ आणि अनाथांसाठी तीन जागा राखीव आहेत. भरतीप्रक्रियेत १९ जून ते ११ जुलै दरम्यान शारीरिक चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून १:१० प्रमाणात उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले आहे. त्या उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांनी लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. ४० टक्क्यांहून कमी गुण मिळवणारे उमेदवार अपात्र समजले जातील.

hm amit shah instructions to distribute seats according to ability to win assembly elections
जिंकून येण्याच्या क्षमतेनुसारच जागावाटप; अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना बजावले
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
MPSC Maharashtra  State Services Exam Date Update Nagpur
MPSC Update: ‘एमपीएससी’ राज्यसेवा परीक्षेच्या तारखेसंदर्भात मोठी अपडेट, बैठकीमध्ये निर्णय होताच…
Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा
Pune Rural Superintendent, Sandeep Singh Gill,
ग्रामीण अधीक्षकपदी संदीपसिंग गिल; पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून नियुक्ती
RG Kar Medical College Sandip Ghosh
Kolkata Rape Case : “कोलकाता बलात्कार प्रकरण घडल्यानंतर रुग्णालयाच्या नुतनीकरणाचे आदेश”, भाजपाच्या दाव्यामुळे खळबळ
education department, Mumbai municipal corporation,
मुंबई : शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाची पळापळ
Monthly scholarship on behalf of Barty to promote research scholarship of Scheduled Caste students
५९ दिवसांचे आंदोलन, सरकार नरमले, १०० टक्के अधिछात्रवृत्ती

हेही वाचा – औद्योगिकनगरीतील उद्योगांमध्ये घट, १२६ औद्योगिक भूखंडाचे निवासी, वाणिज्यिक वापरात रुपांतर

हेही वाचा – पुढील तीन दिवस पावसाचे; किनारपट्टी, घाटमाथा, विदर्भात जोर

मैदानी चाचणीतून १२ हजार उमेदवार बाहेर

२६२ जागांसाठी राज्यभरातून १५ हजार ४२ अर्ज आले. त्यामध्ये वकील, डॉक्टर, अभियंत्यांसह पदव्युत्तर पदवीधारकांचादेखील समावेश होता. मात्र, मैदानी चाचणीत उत्तीर्ण होऊन लेखीसाठी २९८९ उमेदवार पात्र ठरले. उर्वरित १२ हजार ५३ उमेदवार मैदानी चाचणीमधून बाहेर पडले.