पिंपरी- चिंचवडच्या नवी सांगवी येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासोबत १३ वर्षांच्या मुलाने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चिमुकल्याच्या आईने त्या मुलाविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास साडेतीन वर्षांचा चिमुकला हा राहत्या घरासमोर झोपाळ्यावर खेळत होता. तेव्हा तिथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलगा आला आणि तो ही त्याच्यासोबत खेळू लागला. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्याने साडेतीन वर्षीय चिमुकल्यासोबत अश्लील चाळे केले. याची माहिती साडेतीन वर्षीय चिमुकल्याने घरच्यांना दिली.

कुटुंबीयांनी याबाबत चर्चा केल्यानंतर रविवारी पोलिसांकडे तक्रार दिली. रात्री उशिरा सांगवी पोलीस ठाण्यात चिमुकल्याचा आईने तक्रार दिली. त्यानुसार सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी नोटीस बजावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.