सासवड येथे होणाऱ्या नियोजित मराठी साहित्य संमेलनासाठी पिंपरी पालिकेने तीन लाख रुपयांचे अर्थसाहाय्य केले आहे. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत यासह सव्वा कोटींच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली.
स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सासवड येथे जानेवारी २०१४ मध्ये साहित्य संमेलन होणार आहे. त्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी संयोजकांनी पिंपरी पालिकेकडे केली होती. त्यानुसार, दोन लाख ९९ हजार रुपये देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. याशिवाय, १ जुलै २०१२ ते ३० एप्रिल २०१३ या कालावधीतील पोलिसांची महागाई भत्ता बिले तसेच मे २०१३ ते ऑगस्ट २०१३ ची मासिक वेतन बिले देण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयास ४२ लाख रुपये देण्यास मान्यता देण्यात आली. हाफनिक बायो फार्मा कार्पोरेशन ही शासन अंगीकृत उपक्रम असलेली कंपनी असून शासन निर्णयाप्रमाणे आवश्यकतेनुसार काही औषधे खरेदी करण्यात येणार आहे, त्यासाठी दोन लाखांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

Story img Loader