जकात रद्द करून एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू केल्यानंतरपिंपरी महापालिकेला पहिल्याच महिन्यात ३० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. जकातीच्या दरमहा १०० कोटींच्या तुलनेत ही रक्कम कमी असली, तरी एलबीटीला असलेला तीव्र विरोध पाहता याविषयी प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य शासनाने एक एप्रिलपासून पिंपरीत एलबीटी लागू केली आहे. पुढील महिन्याच्या दहा तारखेपर्यंत एलबीटी भरणे अपेक्षित आहे. शासनाने नंतरही मुदत २० तारखेपर्यंत वाढवली. त्यानुसार, १० मे पर्यंत पिंपरी पालिकेत ३० कोटी रुपयांचा भरणा झाला आहे, २० तारखेपर्यंत ही रक्कम आणखी वाढू शकेल, अशी माहिती एलबीटी विभागाचे प्रमुख अशोक मुंढे यांनी दिली.
‘एलबीटी नको’ म्हणत व्यापारी रस्त्यावर आले आहेत. खासदार गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विरोधात आंदोलन सुरूच आहे. अशा परिस्थितीत एलबीटीचे काय, अशी चिंता पालिका प्रशासनाला होती. तथापि, पहिल्या महिन्याचे उत्पन्न ३० कोटींपर्यंत गेल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आजमितीला २७ हजार ४२६ व्यापाऱ्यांनी एलबीटी नोंदणी केली असून आणखी तीन हजार नोंदणी होईल, अशी अपेक्षा मुंढे यांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा