पुणे : व्यवसायासाठी ३० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची दीड काेटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी राघवेंद्र एन. (रा. अदानी वेर्स्टन हाईट्स, मनीषनगर, अंधेरी, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशिष श्रीकांत सहाय (वय ३८, रा. ब्रम्हा सनसिटी वडगाव शेरी) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – पुणे : शेंगदाणा शंभरीपार, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थानातील लागवड क्षेत्रात घट

फिर्यादी आशिष सहाय आणि आरोपी राघवेंद्र यांची पुण्यात ओळख झाली होती. त्यांची मैत्री झाली होती. पुण्यात आयपीएलच्या क्रिकेट सामन्यापासून त्यांची ओळख वाढली होती. सहाय यांचा कपडे तयार करण्याचा व्यवसाय आहे. नगर रस्त्यावरील केसनंद येथे त्यांना कंपनी सुरू करायची होती. त्यासाठी ३० कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. नामांकित व्यक्तींशी ओळख असल्याची बतावणी आरोपी राघवेंद्रने केली होती. कर्ज मंजुरी प्रक्रियेसाठी दीड कोटी रुपये सहाय यांच्याकडून आरोपीने घेतले. त्यानंतर त्यांना कर्ज मिळवून दिले नाही.

हेही वाचा – पुणे : जिल्हा नियोजन समितीवर भाजप, शिंदे गटाचे वर्चस्व; पदाधिकारी, माजी आमदारांचे पुनर्वसन

सहाय यांनी विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सहाय यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब टापरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Story img Loader