पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांच्या सोईसाठी सीएनजीवर धावणाऱ्या १०० गाड्या घेण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे. त्याचबरोबर २०० गाड्या भाडेकराराने घेण्यात येणार असून, त्याबाबतची प्रक्रिया पीएमपी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. पीएमपीच्या ताफ्यात नव्याने गाड्या येणार असल्याने प्रवाशांनाही विविध मार्गांवर गाड्या उपलब्ध होणार आहेत.

प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे ५० गाड्या असणे आवश्यक आहे. पीएमपीच्या ताफ्यात दोन हजार १४२ गाड्या असून, त्यांपैकी एक हजार ४०० गाड्या दैनंदिन संचलनात असतात. त्यामुळे एक लाख लोकसंख्येसाठी ५० गाड्या ही मागणी पूर्ण करण्यासाठी तीन हजार ५०० गाड्यांची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन पीएमपीच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्वमालकीबरोबरच भाडेकराराने गाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गाड्या खरेदीची प्रक्रिया पीएमपी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून, येत्या काही दिवसांत पीएमपीच्या ताफ्यात या गाड्या उपलब्ध होतील, अशी माहिती सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिली.

Undisciplined drivers fined Rs 18 lakh 90 thousand Traffic Department takes action
बेशिस्त वाहनचालकांना १८ लाख ९० हजार रुपयांचा दंड; वाहतूक विभागाची कारवाई
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
PMC News: महापालिकेचे १०० सफाई कर्मचारी जाणार इंदूरला हे आहे कारण !
MSRTC on hike in bus fares review in marathi
विश्लेषण : एस.टी. भाडेवाढ अपरिहार्य होती का?
Pune Traffic Congestion, Amitesh Kumar,
पुणे : कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
Commissioner orders surgical strike on encroachments to break traffic jam
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
rto measures for safe travel on the Mumbai-Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी उपायांची जंत्री
Pollution Control Boards instructions to plan for pollution for the next 20 years Pune news
पुणे: पुढील २० वर्षांच्या प्रदूषणाचे नियोजन करा, प्रदूषण महामंडळाच्या सूचना !

हेही वाचा – पुणे : रेल्वेच्या आदेशाला ‘आरपीएफ’चा ठेंगा! स्थानकातील वाहनतळ हटविलाच नाही

पीएमपीने स्वमालकीच्या गाड्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पीएमपीकडे निम्म्याहून अधिक गाड्या ठेकेदारांच्या आहेत. तसेच डिझेलवरील गाड्या हद्दपार करण्याचे धोरणही पीएमपीने स्वीकारले आहे. त्यानुसार सीएनजीवरील गाड्या घेण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. भाडेतत्त्वावरील गाड्यांमुळे प्रति किलोमीटरनुसार ठेकेदारांना पैसे द्यावे लागत असून, सीएनजीचा खर्चही पीएमपी प्रशासनाला सोसावा लागत आहे. त्यामुळे यापुढे सीएनजीवरील गाड्या खरेदी करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. केंद्र सरकारकडूनही फेम योजनेअंतर्गत पीएमपीला गाड्या खरेदीसाठी निधी मिळाला आहे. या अनुदानातूनही पीएमपीच्या ताफ्यात काही गाड्या येणार असून, टप्प्याटप्प्याने १५० गाड्यांची खरेदी करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत सीएनजीवर धावणाऱ्या गाड्यांबरोबरच विजेवर धावणाऱ्या गाड्या खरेदीचेही नियोजन असून, ताफ्यातील गाड्यांची संख्या वाढल्याने प्रवासी सेवेचाही विस्तार होणार आहे.

पीएमपीच्या स्वमालकीच्या गाड्या – १०१२

भाडेतत्त्वावरील गाड्या – ११३०

हेही वाचा – पुणे : मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत अडथळा; पीएमपीचे ‘हे’ मार्ग होणार तात्पुरते बंद

ताफ्यातील गाड्यांचे प्रकार

सीएनजी – १५९४

डिझेल – १५०

ई-बस – ३५०

Story img Loader