पुणे : ‘प्रेमदिना’चे (व्हॅलेंटाईन डे) औचित्य साधत ३१ प्रेमी युगुले नोंदणी पद्धतीने लग्नगाठीत अडकले. विवाहाचे बंधन गुंफताना पारंपरिक पद्धती ऐवजी प्रेमदिनाचा मुहूर्त युगुलांनी साधला. तरुणाईच्यासाठी चौदा फेब्रुवारी हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा असतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या दिवशी विवाह करण्यास पसंती दिली जात आहे. प्रेमदिनी नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी शहर विवाह नोंदणी कार्यालयात सुमारे पूर्वनोंदणी केली जाते. यंदा ३१ युगुलांनी पूर्व नोंदणी करत विवाह केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रिका आणि मुहूर्त पाहून विवाह करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्याबरोबरच नोंदणी पद्धतीने विवाह (रजिस्टर्ड मॅरेज) करणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. नवी पिढी पत्रिकेवर फारसा विश्वास ठेवत नसल्याने आपल्या सोयीप्रमाणे विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन लग्न करते. या कार्यालयात नोंदणी करून होणारे विवाह विशेष विवाह कायद्यानुसार होतात. विवाहाच्या वेळी किचकट प्रक्रियाही नसल्याने नोंदणी करून विवाह करण्याचे प्रमाण वाढत आहे, अशी माहिती विवाह नोंदणी अधिकारी संगीता जाधव यांनी दिली.

दरम्यान, चौदा फेब्रुवारी या दिवशी विवाह करण्यासाठी सुमारे एक-दीड महिन्यांपूर्वीच पूर्व नोंदणी शहर विवाह नोंदणी कार्यालयात करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) शासकीय मुद्रणालय (फोटोझिंको) येथील विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी मोठी गर्दी होती.

विवाहानंतर प्रमाणपत्र हातात

मुंबई, मुंबई उपनगर आणि पुणे अशा तीन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विवाह नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. विवाह नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोटीस आणि त्यासाठी आवश्यक पुराव्यांची कागदपत्रे जमा केल्यानंतर ३०

दिवसांच्या आत कोणत्याही प्रकारचा आक्षेप न आल्यास वधू आणि वर तीन साक्षीदारांसमक्ष अधिकाऱ्यांसमोर विवाह करू शकतात. विवाहाचे प्रमाणपत्रही लगेच देण्याची व्यवस्था दुय्यम निबंधक कार्यालयाकडून दिले जाते.