लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : शहरात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची माहिती मिळावी यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस टॅगिंग) करून वृक्षांची गणना करण्यात आली आहे. या गणनेत शहरात ३२ लाख १६ हजार ७९९ वृक्ष असल्याचे दिसून आल्याचा दावा महापालिकेने केला आहे. दरम्यान, वृक्षछाटणी, तोड करण्याबाबत नागरिकांना ऑनलाइन परवानगी देण्यासाठी उपयोजन (ॲप) विकसित केले नसल्याने संबंधित ठेकेदाराला महापालिकेने नोटीस बजावली आहे.

४१ इमारतींवरील कारवाईला वेग ,एकाच दिवसात ४ इमारती जमीनदोस्त
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
vasai virar municipal corporation Planning of development plan according to 10 sectors
विकास आराखड्याचे १० विभागानुसार नियोजन, आरक्षित भूखंडावर अतिक्रमणाबाबत महापालिकेचे मौन
GBS , Pune, Pune Municipal Corporation,
पुणे : शहरात ‘जीबीएस’चा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेने घेतले मोठे निर्णय!
pradhan mantri awas yojana, funds , private developers ,
पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना ५० कोटींचा जादा निधी! केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून अखेर विचारणा!
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?
Replantation of 2097 trees for Thane Municipal Headquarters
६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव; ठाणे महापालिका मुख्यालयासाठी २०९७ वृक्षांचे पुनर्रोपण
Pune Municipal Corporation has decided to make it mandatory for tanker drivers to obtain license
पाणी नक्की कुठून घेतले, कुठे दिले हे सांगावे लागणार!

महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन अधिनियमानुसार रस्त्याच्या कडेने किती वृक्ष असावेत याबाबत मानक ठरले आहे. २४ मीटर व अधिक रुंदीचे रस्ते असल्यास प्रत्येक दहा मीटर अंतरावर एक वृक्ष आवश्यक आहे. १२ ते २४ मीटर रुंदीचे रस्ते असतील, तर रस्त्याच्या दुतर्फा १० मीटर अंतरावर एक वृक्ष, सहा ते १२ मीटर रुंदीच्या रस्त्यावर प्रत्येक २० मीटर अंतरावर एक वृक्ष असला पाहिजे. हे निकष पिंपरी-चिंचवड महापालिका पूर्ण करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सन २००७ मध्ये केलेल्या वृक्षगणनेत शहरात १८ लाख ९३ हजार झाडे आढळली होती. २००७ ते २०१७ पर्यंत शहरातील वृक्षगणनाच करण्यात आली नव्हती.

आणखी वाचा-इंद्रायणी पुन्हा फेसाळली; देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देणार का?

तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी, सन २०१८ मध्ये भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे वृक्षगणनेचा आदेश दिला होता. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून मुंबईतील मे. टेरेकॉन इकोटेक प्रा. लि. कंपनीला काम देण्यात आले. हे काम सहा कोटी ७६ लाख ४५ हजार २३८ रुपयांचे होते. संबंधित कंपनीला दोन वर्षांसाठी वृक्षगणना व पाच वर्षे देखभालीची मुदत देण्यात आली. कंपनीकडून वृक्षगणनेचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार शहरात ३२ लाख १६ हजार ७९९ वृक्ष आढळून आले आहेत.

वृक्षछाटणी, तोड करण्याबाबत नागरिकांना ऑनलाइन परवानगी देण्यासाठी उपयोजन (ॲप) विकसित करण्याचेही काम संबंधित कंपनीला दिले होते. मात्र, या कंपनीने कामाची मुदत संपूनही उपयोजन विकसित केले नाही. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाने मे. टेरेकॉन इकोटेक प्रा. लि. कंपनीचे एक कोटी ६९ लाख ११ हजार ४८६ रुपयांचे देयक दिले नाही. या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.

आणखी वाचा-…तर मुळशीतून पाणी द्या; आयुक्तांची भूमिका

शास्त्रोक्त पद्धतीने वृक्षगणना झालेली नाही. वृक्षांची अंदाजे आकडेवारी काढली आहे. शहरात ३० लाख नाही, तर १५ लाखांच्या आसपास वृक्ष आहेत. लागवड केलेल्या वृक्षांपैकी किती जिवंत आहेत याबाबतची माहिती ठेवली जात नसल्याचा आरोप प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केला. शहरातील वृक्षगणना पूर्ण झाली आहे. वृक्ष प्राधिकरण कामकाजाच्या अनुषंगाने उपयोजन विकसित केले नसल्याने संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे उद्यान विभागाचे सहायक आयुक्त उमेश ढाकणे यांनी सांगितले.

Story img Loader