पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यावर एकूण ६९ हजार २१८ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी घेण्याचे काम सुरू आहे. सद्य:स्थितीत ५८ हजार ९८४ हरकतींवर सुनावणीसाठी नागरिकांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी ६० टक्के म्हणजे ३३ हजार ५२३ नागरिकांनी सुनावणीला उपस्थिती लावली असून आपले म्हणणे सादर केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : हडपसरमध्ये मैत्रिणींची आत्महत्या ; एकीने गळफास घेतला, दुसरीची इमारतीतून उडी

पीएमआरडीएच्या हद्दीत ८१४ गावांचा समावेश होतो. पीएमआरडीएने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस प्रारूप विकास आराखडा प्रसिध्द केला. त्यावर दोन महिन्यात ६९ हजार हरकती नोंदविल्या आल्या आहेत. पीएमआरडीएच्या हद्दीत १८ शहरी विकसन केंद्र, आठ ग्रामीण विकसन केंद्र आहेत. या सर्व विकास आराखड्यावर आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात येत आहे. आराखड्यावर सुनावणी १४ एप्रिल २०२२ पासून सुरू झाली. पीएमआरडीएच्या प्रारूप आराखड्यावर आलेल्या उर्वरित दहा हजार २३४ हरकतींवर १९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत सुनावणी घेण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.

हेही वाचा >>> पुणे : मिळकतकरातील चाळीस टक्के सवलतीबाबत आज मुंबईत बैठक

विकसन केंद्राचे नाव, एकूण हरकतींची संख्या, सुनावणीसाठी उपस्थितांची संख्या आणि टक्केवारीरांजणगाव १९३१-१२६५-६५.२१, वाघोली ४११७-२४५०-५९.५१, उरुळीकांचन ११४४-५४३-४७.४७, लोणी काळभोर ४२६४ -२३५८-५५.३०, खेड शिवापूर १०२१-५८६-५७.३९, खडकवासला २१६०-१३५८-६२.८७, सासवड १७८६-१०५५-५९.०७,पिरंगुट २७८०-१७९७-६४.६४, हिंजवडी ४१५२-२५८१-६२.१६, तळेगाव २७५०-१४३१-५२.०४, आळंदी ४१६०-२७१९-६५.३६,खेड राजगुरुनगर ८२८-५११-६१.७१, चाकण ३८९७-२४३७-६२.५४, मळवली २८९१-१५९५-५५.१७

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 33 thousand citizens attended the hearing on the draft plan pune print news amy